मुंबई: राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
परंतु या संभाव्य लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजप आणि त्याचबरोबर सत्तेतील देखील काही नेते मंडळींचा विरोध असलेयाचे दिसून अयेत आहे. ‘लॉकडाऊन हा अंतीम पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊन आमचा सक्त विरोध आहे. लॉकडाऊनऐवजी रूग्णांसाठी खाटा वाढवा, लसीकरण वाढवा, विलगीकरण कक्ष उभे करा असा आमचा आग्रह असून पायाभूत सुविधा वाढविणे हाच यावर पर्याय आहे, असे मत अनेकांनी आज व्यक्त केले. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
‘राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, असे सरसकट सगळय़ांचेच म्हणणे आहे व ते योग्यच आहे. महाराष्ट्रात सध्या रोज पंचवीस हजारांवर कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत पाच-सहा हजार रोजचा आकडा आहे. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाटा नाहीत. हे चित्र तरी राज्याला परवडणारे आहे काय ? राज्यात कोरोनाच्या संक्रमणास लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉक डाऊनचे संकेत दिले आहेत. त्या लॉक डाऊनवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. ‘महाराष्ट्रात लॉक डाऊन कराल तर याद राखा. रस्त्यांवर उतरू,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लॉक डाऊन नकोच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल सांगत आहेत. लॉक डाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्याची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉक डाऊन गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्यच आहे. टाळेबंदी करून लोकांना घरी बसायला लावण्याचा सरकारलाही काही छंद नाही. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्यावाढीच्या स्पर्धेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. हे काही आपल्याला शोभणारे नाही. लोकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरी यास कारणीभूत आहे. ‘गेला गेला कोरोना गेला आहे’ असे मानून लोकांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी सुरू केली. त्यात मास्क लावायचा नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळायचे नाही. ग्रामीण भागात तर जे लग्न समारंभ साजरे केले गेले त्यात हजारोंची गर्दी करून लोकांनी कोरोनासाठी पुन्हा पायघडय़ाच घातल्या. ‘आम्हाला काय कुणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेतून कोरोना वाढतच गेला.’ पुन्हा कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकीर मंडळींना दुश्मन वाटू लागतात अशी टीका शिवसेनेने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! जमिनीच्या लालसेपोटी पत्नीला संपवलं
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस


