🕒 1 min read
मुंबई : मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते.
कोविड-19 च्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांचे कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी – सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
