बीड : भूमिअभिलेखचा बनावट नकाशा, खरेदी खत व इतर दस्तावेज तयार करून शहरातील मोक्याच्या ठिकाणची तीन एकर जमीन बळकावणाऱ्या भूमाफियांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. आरोपींमध्ये प्रवीण मौजकर, गौतम खटोड, रतनलाल नहार या बड्या लोकांसह रामराव तावरे व भरत तावरे या बंधूचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसेचे पदाधिकारी अशोक शिवाजी तावरे (रा.रामतीर्थ, एमआयडीसी, बीड) यांची स्वा. सावरकर कॉलेजजवळील फुलाईनगरमधील सर्वे क्र.२१६ अ, २१७ आ आणि २१८ ई मध्ये वडिलोपार्जित तीन एकर २७ गुंठे जमीन आहे. अशोक तावरे यांचे वडील शिवाजी तावरे यांच्या नावे जमीन नसताना ती नावे करून घेतली. त्यानंतर ती बनावट खरेदीखत तयार करुन ती विक्री केली. त्यानंतर जमिनीचे दोनवेळा खरेदी-विक्री व्यवहार झाले.
मात्र, प्रत्येकवेळी जमिनीचा मूळ नकाशा बदलून बनावट कागदपत्रे तयार केली. या प्रकरणी अशोक तावरे यांनी भूमिअभिलेखकडे मूळ दस्ताऐवज मागितले. त्यात हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तावरे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन प्रवीण दयासागर मौजकर, गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार, रामराव किसनराव तावरे, भरत किसनराव तावरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. मोठ्या लोकांची नावे या गुन्ह्यात अडकल्याने बीड शहरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तर औरंगाबादमधील ‘हा’ भाग होणार लॉकडाऊन
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

