🕒 1 min read
जालना : देशभरात इंधन दरवाढीने सर्वमानान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपासून घरगुती गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावर मिळणारी सबसीडी देखील मिळत नाहीये. त्यामुळे जाफ्राबाद येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा करण्यात आला. तसेच, गॅस दरवाढीचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीड पोष्टाने गोवऱ्या पाठविण्यात आल्या.
देशभरात गॅसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत. त्यामुळे गॅस दरवाढीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महीला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार आणि पालकमंत्री राजेश टोपे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पोष्टा मार्फत गोवऱ्या स्पीड पोष्टाने पाठविण्यात आल्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जाफराबाद तालुकाध्यक्ष सिंधू दिवटे, अंजना वाकडे, कुसुम राऊत, शेख मुजीब, शेख सऊद, फारेस चाऊस यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील बेरोजगारीला मोदी सरकारचा ‘तो’ निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंगांनी मोदींना फटकारलं
- सायबर अटॅक हा तांत्रिक विषय, बावनकुळेंना समजणार नाही : अनिल देशमुख
- आ.प्रशांत बंब हे गंगापूरचे विजय मल्ल्या-कृष्णा पाटील डोणगावकर
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- कोरोना काळात गरीब भिकेला लागले, अन् धनदांडगे अब्जाधीश झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
