औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषदेच्या विरोधात सफाई कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. वेतनासाठी पाण्याच्या टाकीवर कामगार चढले आहेत. यात पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात. सिल्लोड नगर परिषदेवर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी, मुलगा यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
सिल्लोड नगर पालिकेवर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. परंतू, पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन दिलेले नाही. वेतन मिळत नसल्याने कामगारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा मागणी करून, आंदोलनाचा इशारा देऊनही पालिकेने वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त होऊन सफाई कामगार शहरातील मुख्य भागात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले. यावेळी आंदोलकांनी सत्तारांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी सिल्लोड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांच्या घराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पाडले. यामुळे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा भाजपने केला आहे. खासगी मालकीच्या जागेवर संरक्षक भिंत बांधत असतांना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ते पाडल्याच्या निषेधार्थ भाजपने पंधरा दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी भाजपने सत्तार यांच्यावर जातीयवाद करत असल्याचा आरोप केला. ते हिंदूंना नाहक त्रास देत असल्याचे म्हटले. कुठलीही बांधकाम सूचना किंवा नोटीस दिल्याशिवाय पाडता येत नाही. परंतु राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्यावर राजकीय सुड उगवण्यासाठी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे बांधकाम पाडल्याचा आरोप भाजपने केला.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- संत नामदेवांच्या जयंतीचा उल्लेख परिपत्रकात करा; वर्षा गायकवाड, राजीव सातव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- प्रेट्रोल, डिजेल दरवाढीनंतर या कारणामुळे परभणी पुन्हा चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
