Share

औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारच्या मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधीवेशनात औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदिप जैस्वाल यांनी औरंगाबाद मनपाचे ३० तो ४० भुखंड खासगी व्यक्तीने बळकावले अशी तक्रार केली होती. मात्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यात तथ्य नसल्यासे उत्तर देत हा प्रकार थोपवण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्यात शहरातील त्रिमुर्ती चौकातील एका भुखंडाच्या पीआर कार्डावरून महापालिकेचे नाव वगळण्यात आले असल्याचा प्रकार समोर आला होता.

महानगरपालिकेतील मालमत्ता विभाग व नगररचना विभाग या दोन्हा विभागात समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे यासारखे अनेक भूखंड महानगरपालिकेच्या नावावर नाही. हे सर्व भुखंड खासगी लोकांनी बळकावले आहे असे आमदार जैस्वाल यांचे म्हणने होते. या प्रकारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, असे आमदार जैस्वाल यांचे म्हणने होते. औरंगाबाद मनपा क्षेत्रातील गारखेडा, विनायकनगर, त्रिमूर्ती चौक येथील मिळकत नगर भूमापन अधिकाऱ्यांनी १९९५ मध्ये विकास प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता नवीन मिळकत पत्रिका उघडून त्यास संबंधित खरेदीदाराचे नाव लावले. याबाबत नगर भूमापन कार्यालयाकडून जागेची मोजणी करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष जागेवर मनपाचे कर्मचारी पाठवले असता, मोजणी करावयाची मिळकत ही मनपाची असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, औरंगाबाद मनपाचे सुमारे ३० ते ४० भूखंड खासगी व्यक्तीने बळकावले यात तथ्य नसल्याचे सांगत, त्रिमूर्ती चौकातील एका भूखंडाच्या मोजणीच्या वेळी आखीव पत्रिकेवरून मनपाचे नाव वगळण्याची बाब निदर्शनास आली, ही वस्तुस्थिती आहे. असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!