मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा पुनरुच्चार देखील केला आहे. गेले काही महिने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर असं करावं या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने हा मुद्दा तापल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, शिवसेना संभाजीनगर असं नामकरण करण्यास आग्रही असली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या किमान कार्यक्रमावर आधारित आहे, त्यात नामकरणाचा अजेंडा नसून विकासाला प्राधान्य दिलं जाईल, असं भाष्य करत काँग्रेसने नामकरणाला विरोध केला होता. आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण होणारच असं वक्तव्य केलं आहे.
तसेच, शिवसेनेच्या हिंदुत्वावरून आरोप करणाऱ्या भाजपला देखील लक्ष्य केलं आहे. शिवसेनेचं हिदुत्व हे बाळासाहेबांचं हिदुत्व आहे. होय, आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का देत नाहीत?’ असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडांचा राजीनामा गेला कुठे ? राष्ट्रवादीने दाखवलं CMO कडे बोट !
- धनंजय मुंडेंनी केली मागणी, आदिती तटकरेंकडून तत्काळ पूर्तता
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी


