Share

धनंजय मुंडेंनी केली मागणी, आदिती तटकरेंकडून तत्काळ पूर्तता

Published On: 

बीड : अंबाजोगाई न्यायालय इमारतीला मान्यता मिळाली आहे. पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी ७.८० कोटी रुपयांचा आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन हा निधी देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विधी विभागाचे सहसचिव नितीन जीवन यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून याद्वारे इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील तालुकास्तरीय न्यायालयाच्या इमारतीमध्ये बांधकामासह, न्यायदान कक्ष, लिफ्ट, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणी पुरवठा, मलनि:सारन, फर्निचर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, सोलार, बगीचा आदी पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. ना.धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

सदर बांधकामाचे अंदाज पत्रक दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यास हिरवा कंदील दाखवला आहे. मंजूर करण्यात आलेल्या ७ कोटी ८० लाख रुपयांपैकी ४ कोटी २३ लाख रुपये पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात यावेत व उर्वरित रक्कम अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात यावी असेही सदर शासन आदेशद्वारे संबंधित यंत्रणेला निर्देशित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!