रतलाम- मध्य प्रदेशातील रतलामचा एक वकील कित्येक दिवस झाले तुरूंगात आहे. या वकिलाची जेलमध्ये जाण्याची कहाणी फारच मजेशीर आहे. या वकिलाने महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्याने या वकिलाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या महिला न्यायाधीशाने वकिलाविरोधात आयटी कायद्यासह इतर कलमांत गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वकिलाने जेएमएफसी कोर्टाकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली परंतु त्याला कोठूनही त्याला दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे जामिनाचे प्रकरण आता उच्च न्यायालयात दाखल झाले आहे.
रतलाम जिल्हा न्यायालयात असलेल्या या महिला न्यायाधीशांचा जानेवारीमध्ये वाढदिवस होता. वकील विजय याने मध्यरात्री 1.11 वाजता महिला न्यायाधीशाच्या अधिकृत मेलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठविला. वकिलाने त्याचा एक फोटो न्यायाधीशांच्या फेसबुक अकाउंटवरून डाऊनलोड करुन ग्रीटिंग कार्ड बनवून पाठवला. याप्रकारे वकील विजयने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे महिला न्यायाधीश चांगल्याच भडकल्या. त्यांनी रतलाम पोलिस स्टेशनमध्ये वकीलाविरोधात तक्रार केली.
रतलाम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ पाटीदार यांनी सांगितले की वकील विजय ज्युनियर असून तो सराव करीत आहे. तो अद्याप एक पूर्ण वकील नाही. आता दुसरी परीक्षा दिल्यानंतर त्याला स्टेट बारला माहिती द्यावी लागेल. यानंतर त्याला वकिलीचा परवाना मिळेल. वकिलांची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याच्या या उद्योगांमुळे वकिलांनी विजयचे फार पूर्वीच असोसिएशनचे सदस्यत्व रद्द केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा


