मुंबई : १ मार्च पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकारच्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केल्या आहेत.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी सुरु केली. यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत.
या सर्व प्रकरणा नंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी सभागृहातील सदस्यांना समज दिली. विरोधी पक्षातील नेत्यांचे भाषणे आम्ही शांतपणे एकले आहेत तरी तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांचे भाषण शांत पणे ऐकावे अशी विनंती देखील केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

