Share

संजय राठोडांचा राजीनामा गेला कुठे ? राष्ट्रवादीने दाखवलं CMO कडे बोट !

Published On: 

मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केलं होतं. ‘राजीनामा स्वीकारला आहे. तो राजीनामा फ्रेम करून भिंतीवर लावण्यासाठी नव्हता’ असं ते म्हटले होते. मात्र, अद्यापही हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही, असं आता समोर येत आहे.

भाजपने आज यावरून राज्य सरकारला सवाल करत टीकेची झोडच उठवली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बचावात्मक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला की नाही, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. ही माहिती तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) मिळू शकेल, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले. यामुळे सभागृहात शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!