Share

विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यावरून भाजपने महाविकास आघाडी असंवेदनशील असल्याचा आरोप केला होता. विदर्भावर महाविकास आघाडीचा आकस का ? असा सवाल देखील करण्यात आला होता.

भाजपच्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ‘माझं आजोळ विदर्भ आहे, त्याला मी विसरलेलो नाही. त्याला माझ्यापासून तोडू नका. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही,’ असं त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे. गेले अनेक वर्षे विदर्भाला वेगळं राज्य करण्याची मागणी ही विदर्भातील काही संघटनांकडून केली जात आहे. याला भाजपच्या काही नेत्यांचा देखील पाठींबा असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडं, महाराष्ट्राला तोडण्यास विदर्भातील काही जनतेचा देखील विरोध असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून भाजपला ठणकावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!