मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काल मुंबईत झालेल्या सभेमुळे राज्यातलं राजकीय पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. आता याच टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज सभा घेत आहेत. फडणवीसांची ही उत्तरसभा असेल.
काल उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या सभेनंतर आता भाजपाकडून मुंबईतल्या गोरेगाव भागात आज सभा आयोजित केली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडणार आहे. मात्र ही सभा आज ठरवली गेली नसून, ती पूर्वनियोजित होती. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केली नसल्याची माहिती भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणावर भाष्य करणारं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा. असा इशाराच फडणविसांनी दिला होता. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले होते, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत, विरोधक दहशतीत, सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट..हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा.”
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

