Share

‘सरकारने घालून दिलेले सगळे नियम पाळतो पण 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्या’

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा धोका काही कमी झाला नाही, त्यामुळे हे निर्बंध अजून वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मात्र आता अजून लॉकडाऊन वाढवण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती व्यापारी समाजाने केली आहे.

बाजारपेठा खुल्या करण्यासाठी कोणती नियमावली असावी, याचा प्रस्ताव आम्ही सरकारला देऊ. त्यानंतर सरकारशी चर्चा करुन अंतिम नियमावली ठरवता येईल. पण सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे हाल होतील, असे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी म्हटले. त्यामुळे ठाकरे सरकार 1 जुनपासून दुकाने उघडण्यासाठी परवानगी देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!