Share

मुहुर्त सापडला! आयपीएल २०२१ स्पर्धेची तारिख ठरली

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. कोरोनामुळे स्थगित झालेले आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडऐवजी यूएईत करण्यास बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी सुचवले आहे. अमीन हे आयपीएलचे देखील सीईओ आहेत.

टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताऐवजी यूएईत झाले तरच आयपीएल सामने इंग्लंडमध्ये होऊ शकतील, असे त्यांचे मत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलचे उर्वरित सामने तसेच भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी एसजीएमचे आयोजन केले आहे. आयपीएलसाठी सप्टेंबर महिन्यात तीन आठवड्यांची विंडो मिळेल का, हा एकमेव अडथळा आयोजकांपुढे आहे.

त्यातील UAE वर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो निश्चित झाली आहे आणि २९ मे रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा होणार असल्याचे वृत्त एका प्रसिद्ध वृत्त वाहिनेने दिले आहे. बीसीसीआयच्या या नव्या तारखांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची दमछाक होणार हे निश्चित आहे.

भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. बीसीसीआयनं ही मालिका जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू करावी असा प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यात आता नवा प्रस्ताव समोर येत आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांचा कालावधी आहे आणि तो कमी करून तिसरी व पुढील दोन कसोटी सामने आधी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयनं तयार केला आहे. त्यामुळे सीसीआयला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच अतिरिक्त दिवस मिळतील. पाच कसोटींसाठीच्या ४१ दिवसांच्या विंडोत बदल केल्यास आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बीसीसीआयनं ECB कडे विनंती केल्यास आयपीएलसाठी ३० दिवसांची विंडो तयार होऊ शकते आणि आयपीएलचे उर्वरित सामने १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खेळवले जाऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!