Share

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीचे अनोखं फोटोशुट पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया

Published On: 

मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिने अनोखं फोटोशूट केलं आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अँजेलिनाने चक्क मधमाश्यांसोबत तब्बल १८  मिनिटं फोटोशुट केलं आहे. जागतिक मधमाशी दिनानिमित्त नॅशनल ज्योग्राफिक या मासिकासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार डॅन विन्टर्स यांनी अँजेलिनाचे हे फोटोशूट केलं होत. अँजेलिनाने अगदी संयमाने हे शूट पार पाडलं.या शूटसाठी अँजेलीनाच्या खांद्यावर तसंच डोक्यावर आणि चेहऱ्यावर देखील या मधमाशा दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CPHJLuwl8fK/?utm_source=ig_web_copy_link

याविषयी फोटोग्राफर डॅन विन्टर्स यांनी सांगितले की, “या शुट साठी खास इटालियन मधमाश्या वापरण्यात आल्या होत्या.  या मधमाशा शांत राहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची हानी करू नये, यासाठी विशेष लक्ष दिलं गेलं होतं. तर सेट वर अँजेलीनाला बी सुट प्रोटेक्शन लावण्यात आलं होतं. तर त्यांनी स्वतः हे अँजेलीनाच्या मानेवर , खांद्यावर व चेहऱ्यावर ते लावलं होतं. जेणेकरून मधमाश्या सगळीकडे पसरतील व एकत्र झुंड करणार नाही. फेरोमेन या केमिकलकडे मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अँजेलीना म्हणाले, ‘मी अगदी स्थिर १८ मीनिटांसाठी उभी होती. मधमाश्यांसोबतचा हा अनुभव माझ्यासाठी कायमच लक्षात राहिल. मला असं वाटत की जागतिक मधमाशी दिनानिमित्त आम्ही फोटोग्राफी विश्वात स्वतःची मुळं रुजवली आहेत.’ अँजेलीनाच हे अनोख फोटोशुट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर तिचं कौतुकही होत आहे. काहीच तासांत तिच्या या व्हिडिओला लाखोंनी व्हूज मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!