Share

खुनाच्या आरोपाखाली फरार कुस्तीपटू सुशील कुमारला अखेर दिल्ली पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Published On: 

दिल्ली : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडीअममध्ये ४ मे रोजी झालेल्या मारहाणीमध्ये खुन केल्याप्रकरणी भारताचा ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशील कुमारला आखेर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अटक होण्याआधी सुशीलकुमारने अटकपुर्व जामीनासाठी दिल्ली न्यायालयात याचीका दाखल केली होती. मात्र सुशील कुमारचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला.

दिल्ली येथे ४ मे रोजी छत्रसाल स्टेडियममध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीत हरियाणातील सागर राणा याचा मृत्यु झाला होता. त्याच्या खुनाच्या आरोपाखाली ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमारच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर सुशील कुमार फरार होता. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलीसांनी १ लाख रुपयांचे बक्षिसदेखील जाहीर केले होते. मात्र आखेर सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला अटक करण्यात यश आले. ही माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त नीरज ठाकुर यांनी दिली.

५ मेपासूनच सुशील कुमारचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शोध सुरू केला होता. मात्र सागर राणाच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतरच सुशील कुमार घरातून फरार झाला होता. सुशील कुमारविरोधात याप्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेजही सापडले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार आपल्या २० ते २५ साथीदारांसह सागर राणा आणि दोन अन्य व्यक्तींना मारहाण करताना दिसून आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे त्याचा जामीन नाकारला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!