Share

‘इंडियन आयडॉल १२’ चा आणखी एक ड्रामा समोर; सायली कांबळेच्या पालकांना सांगितले असे करायला

Published On: 

मुंबई : ‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो लोकप्रिय होत असताना अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली आहे. हल्ली टीआरपीसाठी रिअ‍ॅलिटी शो काय करतील याचा नेम नाही. याशोच्या टीआरपीसाठी सुरु असलेले एकापेक्षा एक ड्रामे पाहून लोक संतापले आहेत.

या शोच्या येत्या भागात पाहुणे म्हणून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान या सेलिब्रिटींच्या मदतीने स्पर्धक सायली कांबळेच्या पालकांना नको ते करायले सांगितले. त्यामुळे पून्हा एकदा या शो ला ट्रोल करण्यात येत आहे.  याचा व्हिडीओ सोनी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोनी वाहिनीच्या पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कुमार सानू सायलीच्या आईला तुमचे मिस्टरही रोमँटिक आहेत का नाही? असे विचारतात.

पुढे सानू विचारतात की, त्यांनी तुम्हाला कधी डेटवर नेले आहे का नाही? यावर सायलीची आई नाही असे उत्तर देते. यामुळे सानू त्यांना सांगतात की, आज इथे तुमच्यासाठी कँडल लाईट डिनर आयोजित केले आहे. तुम्हा दोघांची डेट इथेच आहे. हे दोघे रोमान्स करणार आणि मी यांच्यासाठी गाणे गाणार. मग दोघांसाठी स्टेजवरच एक डिनर डेट आयोजित केली जाते. या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा शोवर टीका झाल्या आहेत.

https://www.instagram.com/tv/CPFvyGRHad1/?utm_source=ig_web_copy_link

काही दिवसांपूर्वीच पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल खोटा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही प्रकरण समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या शो मधील दोन स्पर्धकांना बाहेर काढण्याची देखील मागणी करण्यात आली होती. असे एक ना अनेक या शोचे किस्से समोर येत असल्याने अजुन पुढे टीआरपी साठी काय काय करतील सांगता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!