मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची आवडती जोडी म्हणून अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांना ओळखले जाते. अनेक चित्रपटांतून त्यांनी चाहत्यांच मन जिंकलं आहे. मुंबई- पुणे – मुंबई हा अनेकांचा आवडता चित्रपट आहे. अनेक सुपरहीट चित्रपट त्यांनी दिले. स्वप्नील आणि मुक्ताच्या अभिनयाने त्यांनी रसिक प्रेक्षकांमध्ये स्वतःचे असे वेगळे भक्कम स्थान निर्माण केले आहे. पण त्यांचाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस होऊन गेला. यानिमित्त अभिनेता स्वप्निल जोशीने मुक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक त्यांचाच एक जुना व्हिडीओ शेअर केला. स्वप्नीलने यावर म्हणाला की, ‘खूप कमी माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही इतकं निरर्थक पण मनमोकळ हसू शकता !’ यात स्वप्निल आणि मुक्ता एकमेकांशी संवाद साधत आहेत. व त्यादरम्यान ते एकमेकांशी निखळ हसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना फार आवडला असून अनेक कमेन्ट यावर आले आहे.
https://www.instagram.com/p/CO9nGBIFaJw/?utm_source=ig_web_copy_link
मुक्ता आणि स्वप्निल यांची जोडी प्रेक्षकांनाही फार आवडते. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ पासून सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘मंगलअष्टके वन्समोर’, ‘मुंबई- पुणे-मुंबई २ ‘, आणि ‘मुंबई – पुणे – मुंबई ३ ‘ असे हीट चित्रपट त्यांनी दिले आहेत. याशिवाय प्रेक्षकांना या जोडीला आणखी चित्रपटांत पाहण्याची इच्छा आहे. स्वप्निल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो तो नेहमी असे व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, पण उद्धव ठाकरे मात्र कपड्याची इस्त्रीही मोडू न देता मुंबईत परतले’
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- फडणवीसजी, लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा ? – सचिन सावंत
- तुमचे अश्रू म्हणजे फक्त एक इव्हेंट; मोदीजी, ‘त्या’ जनतेचे अश्रू आठवा – चाकणकर
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र


