मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत.सगळ्यांना धक्का दिला.त्यांनतर त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जात असल्याची घोषणा केली. आज दुपारी ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. खडसे कालच मुंबईमध्ये दाखल झाले असून काही मोजकेच समर्थक त्यांच्यासोबत असतील.
खडसेंपाठोपाठ त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी देखील घड्याळच हाती बांधलं आहे. भाजपमधील जवळपास १५ आमदार आपल्या संपर्कात असून ते देखील भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट खडसेंनी केला होता. यासर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली.
यावेळी ते म्हणाले, ‘नाथाभाऊंच्या जाण्याने भाजपने मोठा नेता गमावला आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झाली असली तरी ती पोकळी जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या क्षमतेमुळे भरून काढू’ असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
खडसेंना कोणतं मंत्रिपद मिळू शकत ?
गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड, जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे उत्पादन शुल्क व कामगार विभागाचा कारभार आहे. खडसेंचा मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादी करेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गरज पडलीच तर शिवसेनेशी चर्चा करून कृषी खाते देखील दिले जाईल अशी चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बेपत्ता
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’
- बिहार विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार
- बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राने काय केले? ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

