पुणे : पुण्यातील पाषाणकर उद्योग समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली आहे. त्याबरोबरच गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोट लिहिल्याचंही स्पष्ट झालं आहे.
न्यूज १८ लोकमतने दिलेल्या बातमीनुसार,पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाई नोट सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- पोलिसांवर हात उचलणाऱ्या यशोमती ठाकूर यांना न्यायालयाचा दिलासा
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंचे वक्तव्य मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

