Share

बिहारला मोफत कोरोना लस, मग महाराष्ट्राने काय केले? ; बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये अगदी कोरोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्प बचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला विचारले आहेत.

थोरात पुढे म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत बिहारला १.२५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, त्या पॅकजचे काय झाले याचा बिहारच्या जनतेला मागील पाच वर्षात अनुभव आला असून त्यांची फसवणूक झाली आहे हे समजण्याइतपत बिहारची जनता सुज्ञ आहे. निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे. कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे.

प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्याचा भाजपाचा हेतू काय? हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे, असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!