Share

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना या दसरा मेळाव्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली. यानंतर शिवसेनाप्रमुख दसऱ्याचं औचित्य साधून शिवसैनिकांना संबोधित करण्याला कधीच खंड पडला नाही. यंदा मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.

राजकीय समीकरण बदललं आणि २०१९ च्या विधानसभा निकालानंतरच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने सत्तास्थापन केली. त्याच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा जोश निर्माण झाला. मात्र फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि पुढे हा उद्रेक वाढतच गेला.

त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा घेणे हे मात्र शक्य होणार नाही असं स्पष्ट असल्याने शिवसैनिकांच्या उत्साहाचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. तर, शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सुरू असलेला हा दसरा मेळावा यंदाही घेण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरु आहे.

यंदाचा दसरा मेळावा वेगळ्या पद्धतीने केला गेला तरी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर होणाऱ्या या मेळाव्याची परंपरा मात्र खंडित होणार आहे. शिवाजी पार्क ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हा सोहळा घेण्यासाठी शिवसेनेतर्फे चाचपणी सुरु आहे. तर काही व्यक्तींना या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची व्यवस्था देखील केली जात असून हा दसरा मेळावा देखील भव्यच असेल आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. इतर शिवसैनिकांना ऑनलाईनपद्धतीने सहभागी होता येईल असं देखील समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!