Share

‘खडसेंनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल’

Published On: 

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी काल मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीकाही केली आहे.

मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खडसेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचेही नाव घेतलं. ‘अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला’, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी मला फार त्रास दिला असून ते राजकारणातील कचरा असल्याची घणाघाती टीका सामाजिक अंजली दमानिया यांनी काल , गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. खडसे ज्या पद्धतीने बोलतात त्याविरोधात लढणं आवश्यक नाही का? असा सवाल करतानाच हा एफआयआर दाखल करताना आमचा दोन दिवस छळ करण्यात आला, असंही त्या म्हणाल्या.

खडसे हे खूनशी प्रवृतीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण खडसेंनी जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल, असं त्यांनी सांगितलं.खडसेंना मी धडा शिकवण्यासाठी खंबीर आहे. ते कुठल्याही पक्षात जावोत, मला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही. मी जो गुन्हा दाखल केला त्याच्याशी फडणवीसांचा काही संबंध नाही असं त्या म्हणाल्या.

खडसेंनी मुद्दाम मला त्रास देण्यासाठी माझ्या विरोधात 6 जिल्ह्यात 32 केस दाखल केल्या आहेत. माझ्यासाठी लढलेल्या चित्रा वाघ आणि नीलम गोऱ्हे यांना आता हे दिसत नाही का ? शरद पवारांनी खडसेसारख्या भ्रष्टाचारीला पक्षात कसे घेतले ? अशा प्रश्नांचा भडीमार दमानिया यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!