पटना – नितीशकुमार हे बिहार मध्ये विकासपुरुष म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वात एनडीएला बहुमत मिळेल.नितीशकुमारच पून्हा बिहार चे मुख्यमंत्री होतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बिहार च्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 14 उमेदवार निवडणूक लढत असून रिपाइं उमेदवारांच्या प्रचारासाठी ना रामदास आठवले काल बिहार दौऱ्यावर आले होते. जहाणाबाद येथे रिपाइं चे उमेदवार सतीश कुमार कुशवाहा आणि गया मधील टेकरी या मतदारसंघातील रिपाइं उमेदवारांच्या प्रचार सभांना ना रामदास आठवले यांनी संबोधित केले.
रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत पक्ष असल्याने काही जागांवर निवडणूक लढणे आवश्यक होते. तसेच जेडीयु आणि भाजप च्या एनडीए आघाडीत रिपाइं ला जागा सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बिहार विधानसभेत रिपाइं 14 जागांवर स्वबळावर लढत असून अन्य 229 जागांवर एनडीए ला रिपाइं चा पाठिंबा असल्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले)बिहार विधान सभेतील उमेदवारांची यादी
शिव नारायण मिश्रा – टेकरी मतदारसंघ गया ,सतीश कुमार कुशवाहा – मतदारसंघ – जहानाबाद, दिनेश मंडल – मधुबणी विधानसभा मतदारसंघ, रामजी राय – बेल संड सितामढी, विजयश्री प्रसाद – दरभंगा,बबलू गुप्ता – खजौली मधुबणी,अनिलकुमार यादव – बाबूबरही मधुबणी,श्रीमती नूतन झा – बेनिपट्टी मधुबणी9- धर्मेंद्र कुमार ठाकूर – मुझफ्फरपूर शहर,मनोज पूर्वे – सुरसंड सितामढी,सुंदरम सोनू – सीमरी ; बखतीयारपुर सहरसा,राम कुमार भगत – फरविस गंज; आरारीया13 – दिनेश कुमार यादव – सिकटी आरारीया14 – विंदेश्वर महतो- रीगा सीतामढी
महत्वाच्या बातम्या-
- पाषाणकर समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बेपत्ता
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- ‘खडसेंचे वक्तव्य मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली’
- ‘सीबीआयचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी होत असल्याची शंका’
- ‘खडसे लवकरच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात खूप महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान होतील’


