मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी राज्यातील होत असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर महत्वाचे विधान केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याया गटात सामील होत असताना दिसत आहेत. या सर्व पाश्वर्भूमीवर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “आम्ही मरू पण पार्टी सोडणार नाही, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता –
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच आता या बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव देण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या –


