मुंबई: एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधत बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे.”, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. ते मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलत होते. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टोला लगावला आहे.
“तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, ज्यांना घाण म्हटलं त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे. याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार.”, असा इशारा निलेश राणे यांनी ट्वीट करत दिला आहे.
तीस तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, YZ ज्यांना घाण म्हटलं त्यांच्यामुळेच तुझा बाप त्या खुर्चीवर बसला आहे. याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 26, 2022
दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
- IRE vs IND 1st T20 : हार्दिकच्या टीम इंडियाचा विजयारंभ; मालिकेत घेतली आघाडी!
- Eknath Shinde : “शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…”; एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला धक्का; ठाकरे सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका
- Amit Shah : अमित शहा मैदानात; व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे बंडखोर आमदारांशी साधला संवाद
- IRE vs IND 1st T20 : टीम इंडियानं जिंकला टॉस; तेजतर्रार गोलंदाज उमरान मलिकचं पदार्पण!


