गुवाहाटी : शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे राज्यातील महाविकास आघडी सरकार अस्थिर झालं आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरोधात बंद पुकारलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच आता या बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यानंतर आता शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव देण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिंदे गटाने दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.यामध्ये शिंदे गटाने बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले आहे. यानंतर दुसऱ्या याचिकेत विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद बनविण्यावर आव्हान दिले आहे. यामध्ये विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करण्यात आल्याचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे.
शिंदे गटाने या याचिकेची प्रतही मविआ सरकारला पाठविल्याचे कळते आहे. यामुळे कोर्टाकडून जारी होणाऱ्या नोटीसीचा वेळ वाचू शकेल. या याचिकांवर तात्काळ म्हणजेच उद्या सकाळी साडे दहाला सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदारांना सोमवारी सायंकाळपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे बंडखोर आमदारांनी आपल्यावरील कारवाई ही नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आज केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी शिंदे गटातील आमदारांबराेबर व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आज सकाळीच अमित शहा यांनी बंडखोर आमदारांना संरक्षण देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच अमित शहांच्या आजच्या व्हिडिओ कॅान्फरन्स बैठकीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सहभागी होते. यावेळी शिंदे गटाच्या अपात्रतेविषयी शहांनी चर्चा केली. या व्हिडीओ कॅान्फरन्सिंगमध्ये आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर शहा यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

