Share

IRE vs IND 1st T20 : हार्दिकच्या टीम इंडियाचा विजयारंभ; मालिकेत घेतली आघाडी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि आयर्लंड (IRE vs IND) यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना डब्लिनमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ७ गड्यांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी १२ षटकांचा रंगला. भारताचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हॅरी टेक्टरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडने भारताला १२ षटकात १०९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात दीपक हुडा आणि हार्दिक पंड्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे ९.५ षटकात भारताने सामना खिशात घातला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा डाव

आयर्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून इशान किशन आणि दीपक हुडा यांनी सलामी दिली. किशनने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा केल्या. क्रेग यंगने त्याला बोल्ड केले. यंगने पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला शून्यावर पायचीत पकडले. कप्तान हार्दिक पंड्याने आक्रम करत संघाची धावसंख्या वाढवली. आठव्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर १०व्या षटकात हुडा आणि दिनेश कार्तिक यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. हुडाने ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.

आयर्लंडचा डाव

पहिल्याच षटकात भारताकडून भुवनेश्वर कुमारने आयर्लंडचा कॅप्टन अँड्र्यू बालबर्नीला शून्यावर बोल्ड केले. दुसरा सलामीवीर पॉल स्टर्लिंग (४) आणि गॅरेथ डेलनी (८) जास्त काही करू शकले नाहीत. हॅरी टेक्टरने आक्रमक फलंदाजी करत आयर्लंडसाठी धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. आयर्लंडने १२ षटकात ४ बाद १०८ धावा केल्या.

दोन्ही संघांची playing 11

भारत : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!