Share

Amit Shah : अमित शहा मैदानात; व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे बंडखोर आमदारांशी साधला संवाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच आता या बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यानंतर केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी आज शिंदे गटातील आमदारांबराेबर व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

आज सकाळीच अमित शहा यांनी बंडखोर आमदारांना संरक्षण देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच अमित शहांच्या आजच्या व्हिडिओ कॅान्फरन्स बैठकीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सहभागी होते. यावेळी शिंदे गटाच्या अपात्रतेविषयी शहांनी चर्चा केली. या व्हिडीओ कॅान्फरन्सिंगमध्ये आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्‍याची चर्चा आहे. यानंतर शहा यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला.

दरम्यान, दुसरीकडे आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर बंडखोरांनी आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं. पण भाजपशिवाय दुसरा पाठिंबा देणारा पक्ष कोणता आहे? असं म्हणत शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचंही त्यांनी यांनी सांगितलं. पण आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमिंटमेंट आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. बंडखोरांवर कारवाई करायची का नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत कारवाई होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!