🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रिद्धिमान साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराबद्दल अधिक माहिती विचारणार आहे. साहाने सांगितलेल्या ‘त्या’ प्रतिष्टीत पत्रकाराने साहा मुलाखतीसाठी सहमत नसल्याबद्दल त्याला धमकी दिली होती. बीसीसीआयने या घटनेवर कारवाई करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.
अनेक लोकांनी या घटनेबाबत निंदा व्यक्त करत बीसीसीआयला कारवाई करण्याची विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी माहिती देत सांगितले “होय, आम्ही रिद्धिमानला त्याच्या ट्विटबद्दल विचारू आणि घडलेली खरी घटना काय आहे हे सुद्धा पूर्णपणे माहिती करून घेऊ. त्याला धमकावण्यात आले होते का आणि त्याच्या ट्विटची पार्श्वभूमी आणि संदर्भ देखील आम्हाला माहित असणे आवश्यक आहे. मी अधिक काही बोलू शकत नाही. सचिव (जय शाह) नक्कीच रिद्धिमानशी बोलतील,”
बीसीसीआय जरी रिद्धिमान साहाला नाव विचारात असेल तरी त्याने नाव न सांगण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्याला कोणाचेही करिअर खराब करायचे नसल्याचे तो म्हणाला होता. देशासाठी ४० कसोटी सामने खेळलेल्या साहाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले होते की त्याचे संघात येणे कठीण आहे आणि त्याने काय तो निर्णय घ्यावा. साहाने द्रविडसोबत ड्रेसिंग रूममधील संभाषण उघड केले होते. त्याच्या या वक्तव्याचा कोच जॅमीने आदर केला होता.बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्याला संघातून वगळले जाणार नाही, असे आश्वासन देण्यासाठी मजकूर पाठवला होता, असा दावाही साहाने केला होता.
महत्वाच्या बातम्या
- रात्री १२ वाजता भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
- निवृत्ती घेण्याआधी धोनी चहरला भेटला होता; आणि सांगितली हि मोठी गोष्ट!
- शरद पवार भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार; नवाब मलिकांची माहिती
- रशिया-युक्रेन युद्ध; अमोल कोल्हे यांनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी
- ‘दिशा सालीयन केस प्रकरणात घटनेचा अहवाल ४८ तासांत सादर करा’ – रुपाली चाकणकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
