🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) भीमा कोरेगावप्रकरणी (bhima koregaon)आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार असून याबाबतचे त्यांनी आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे.
दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांना आयोगाने बोलावले होते. दरम्यान येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे पवारसाहेब नक्कीच आयोगासमोर हजर होतील, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
आता शरद पवार आयोगाकडे नेमकी कोणती बाजू मांडणार, कोणते मुद्दे उपस्थित करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार आयोगासमोर उपस्थित राहण्याची चर्चा अनेक दिवसांनी रंगली होती, त्यावरच नवाब मलिक यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रशिया-युक्रेन युद्ध; अमोल कोल्हे यांनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी
- ‘दिशा सालीयन केस प्रकरणात घटनेचा अहवाल ४८ तासांत सादर करा’ – रुपाली चाकणकर
- VIDEO : अनसोल्ड झाल्यानंतर रैनाची बीसीसीआयला विनंती भावनिक होत म्हणाला…
- Russia-Ukraine Crisis:रशियाने युक्रेनमध्ये सैन्य हलवले; जाणून घ्या सविस्तर
- ‘राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेत’ – राजू शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
