Share

रशिया-युक्रेन युद्ध; अमोल कोल्हे यांनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धवाद सुरु आहे. ज्याचे पडसाद जगभर उमटत आहे. पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine)आणि रशिया (Russia)यांच्यातला तणाव काही नवीन नाही. मात्र आता हा तणाव इतका वाढला आहे की, युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे.

“रशिया-युक्रेन सीमेवर युद्धाच्या परिस्थितीत, मी एअर इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, फ्लाइट फ्रिक्वेन्सी वाढवावी. आणि युक्रेनमध्ये राहिलेल्या भारतीयांना परत देशात आणावे. दोन्ही देशांमधील तणाव लवकरच संपेल अशी आशा आहे.”, असे ट्वीट अमोल कोल्हे यांनी केले आहे.

दरम्यान युक्रेनमध्ये सध्या २० हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश मेडिकलचे म्हणजेच वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. तर आयटी, फार्मा आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या सुरक्षिततेची सगळ्यांत जास्त चिंता भारताला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!