Share

निवृत्ती घेण्याआधी धोनी चहरला भेटला होता; आणि सांगितली हि मोठी गोष्ट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने दीपक चहरला नेहमीच अष्टपैलू म्हणून पहिले आहे. यामुळेच मेगा ऑक्शनमध्ये CSK ने चहरला पुन्हा संघात आणण्यासाठी तब्बल १४ कोटी खर्च केले. माहीच्या नेतृत्वात चहरने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यामुळेच त्याचे आणि धोनीचे चांगले जमते. चहरने नुकत्याच एका मुलाखतीत एक किस्सा सांगितलं आहे. ज्यात माहीने निवृत्तीची घोषणा केली त्या दिवशी माहिने त्याला सल्ला दिला होता.

१५ ऑगस्ट २०२० ला धोनीने निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हा खेळाडू आयपीएलसाठी दुबईत होते. चहर आणि धोनी चेन्नईचा भाग असल्यामुळे सोबत होते. चहर तो किस्सा सांगत म्हणाला ” आम्ही संध्यकाळी एकत्र बसलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितले ‘तू गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहेस पण तुझ्या फलंदाजीला न्याय दिला नाहीस. मला वाटतं तू ते करायला हवं’. ज्या दिवशी त्याने निवृत्ती जाहीर केली त्या दिवशी त्याने मला सांगितले. मी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असे धोनी म्हणाला”

दीपक चहरने यावेळी त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही सांगितले जेव्हा त्याला बॅटिंगचा सराव करायला वेळ मिळायचा. गेल्या काही वर्षात दीपक चहरने भारतीय संघासाठी अष्टपैलू कामगिरी केली आहे. कधी त्याच्या गोलंदाजीने तर फलंदाजीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे . वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याचे श्रीलंका दौऱ्यात आणि आयपीएलमध्येही खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!