🕒 1 min read
नवी दिल्ली: खासदार संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati Birthday Today) यांचा आज जन्मदिन असून खासदार तथा त्यांचे बंधू छत्रपती उदयनराजे (Chhatrapati Udayan Raje) यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. “आमचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार. श्री शिवछत्रपती महाराजांची वंशपरंपरा असणाऱ्या कोल्हापूर व सातारच्या गादीचे ऋणानुबंध आजही आम्ही तितक्याच आपुलकीने जोपासतो”, असे ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केले आहे.
“आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे”, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
आमचे बंधू छत्रपती उदयनराजे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार ! श्री शिवछत्रपती महाराजांची वंशपरंपरा असणाऱ्या कोल्हापूर व सातारच्या गादीचे ऋणानुबंध आजही आम्ही तितक्याच आपुलकीने जोपासतो.
Chhatrapati Udayanraje Bhonsle pic.twitter.com/7Z73G7pseJ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 11, 2022
तसेच जन्मदिनानिमित त्यांनी दिल्ली येथील संसद भवनाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकास अभिवादन करून आशीर्वाद घेतले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाच्या सर्वोच्च सभागृहात फक्त आणि फक्त छत्रपती घराण्यातील श्री शिवाजी महाराज व शाहू महाराज या दोन युगपुरूष लोकराजांची स्मारके उभारण्यात आली आहेत. आणि या राज्यकर्त्या महापुरूषांचा मी वंशज आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
- IPL 2022 AUCTION: मेगा ऑक्शन आधी जाणून घ्या कोणत्या संघाकडे आहेत किती बजेट बाकी !
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
