🕒 1 min read
मुंबई: लवकरच गोवा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरु केली आहे. दरम्यान काल (१० फेब्रुवारी) विरोधी पक्षनेते तथा गोव्याचे प्रभारी अध्यक्ष देवेंद्र फडणवीस (Goa in-charge president Devendra Fadnavis) यांनी गोव्यात भाजपला २२ पैकी २२ जागा मिळणार असून भाजप बहुमताने विजयी होईल, असे म्हटले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“जिंकू द्या त्यांना २२ जागा. कारण फडणवीस त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. आणि नेत्याला आत्मविश्वासाने बोलता आलेच पाहिजे. आम्हीही म्हणतो ११ पैकी ११ जागा जिंकू. कॉंग्रेस म्हणते आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आप म्हणत आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. तृणमूलला वाटते त्यांना बहुमत मिळेल. त्यामुळे नेत्याला आत्मविश्वासाने बोलणे महत्वाचे असते.” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच फडणवीस यांनी मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) भाषणाने भाजपाचा आत्मविश्वास वाढल असून भाजपला बहुमत मिळणार असल्याचे म्हटले यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपचा आत्मविश्वास वाढला, ही चांगली गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या २० सभा झाल्या, आम्ही पहिले. केरळलाही झाल्या होत्या. आणि आता पंजाबमध्येही होत आहे. त्यामुळे पंतप्रधानांना ऐकायला लोक जात असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलत आहे ते बरोबरच बोलत आहेत. त्यांना २२ नाही तर ४० पैकी ४२ जागा मिळोत, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- सोमय्यांना सीआयएसएफने संरक्षण दिले पाहिजे होते; जयंत पाटलांचा सल्ला
- ठाकरे सरकारने संविधानाची हत्या केली; नवनीत राणांचा आरोप
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; भाजप नेत्याचे संजय राऊतांना आवाहन
- मविआ सरकारचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्याच हातात- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
