पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Khasdar Sanjay Raut) यांच्यावर पुणे रुग्णालयातील कोविड घोटाळा यावरून निशाणा साधत टीका केली आहे. राऊत-राऊत यांनी मोठा घोटाळा केला असून त्या दुसऱ्या राऊतने १ हजार ३४ कोटीचा घोटाळा केल्यामुळे ते जेलमध्ये आहेत. त्याच्याकडून संजय राऊतपर्यंत लाभ पोहचला असेल तर संजय राऊत यांना जाब द्यावाच लागणार. असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
तसेच राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जा, किंवा बायडेनकडे जा काही होणार नाही असे म्हटले होते, यावरच प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी “राऊत यांना एवढी मस्ती आहे, एवढा माज आहे, एवढी गुर्मी आहे की, मी लोकांचा जीव घेणार, बोगस आणि घोटाळेबाज कंपनीकडून कोविड कॉन्ट्रॅक्ट घेणार , राज्यातील जनतेची हत्या होऊ देणार. आणि त्यानंतर मला काही होणार नाही, असे म्हणता. ठाकरे सरकारचे लोक असे म्हणतात. मात्र अनिल देशमुख जेलमध्ये गेले. त्यामुळे संजय राऊतांचे मित्रपरिवार पार्टनर त्यांच्यावर कारवाई होणारच. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेत कोविड घोटाळा मुख्यमंत्री ठाकरे यांनी संजय राऊतांच्या मदतीने केल्याचेही सोमय्यांनी म्हटले आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले. रीतसर त्या कंपनीमुळे लोकांचे जीव गेल्याचे रिपोर्ट मध्ये आले आहे. तरी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाच कसा? त्यामुळे उद्धव ठाकरेंनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट राज्यातील जनतेनी दिला आहे का? उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला आहे त्यामुळे कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन


