Share

IPL 2022 AUCTION: मेगा ऑक्शन आधी जाणून घ्या कोणत्या संघाकडे आहे किती बजेट बाकी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार आहे. जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज स्टार्स या स्पर्धेसाठी एकत्र येणार आहेत. ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या ५९० खेळाडूंपैकी २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ असोसिएट नेशन्सचे खेळाडू आहेत. १२ आणि १३ रोजी बंगलोर येथे ऑक्शन होणार आहे. यासाठी १० संघानी कंबर कसली आहे.

आयपीएलमध्ये असणाऱ्या संघांचे बजेटही जाहीर झाले आहे. ऑक्शन आधी प्रत्येक संघाला ९० करोड रुपये देण्यात आले होते. ज्यातून त्यांनी आधीच काही खेळाडूंना रिटेन केले आहे. तर उरलेले बजेट पुढील प्रमाणे आहे. पंजाब किंग्सकडे ७२ कोटी रुपये वाचले आहेत. पंजाबने अर्षदिप सिंग सोबत १२ कोटीत मयांक अग्रवालला रिटेन केले होते. सनरायझर्स हैद्राबादने केन विलियम्सन , अब्दुल समद आणि उमरान मालिकेला रिटेन केले. आता त्यांच्याकडे ६८ कोटी शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वालला रिटेन केले. त्यांच्याकडे ६२ कोटी आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना ३३ कोटी खर्च करत रिटेन केले आहे. आता त्यांच्याकडे ५७ कोटी आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा , जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना ४२ कोटीत रिटेन केले. आता त्यांच्याकडे ४८ कोटी शिल्लक आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने रविंद्र जडेजाला १६ कोटी, धोनीला १२ कोटी, मोईन अलीला ८ आणि ऋतुराज गायकवाडला ६ कोटींमध्ये रिटेन केले आहे. आता त्यांच्याकडे ४८ कोटी बाकी आहेत. कोलकता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला १२ कोटींमध्ये , व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी ८ कोटींसाठी तर सुनील नरेनला ६ कोटींसाठी रिटेन केले. संघाकडे आता ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत., दिल्ली कॅपिटल्सने  रिषभ पंत , पृथ्वी शॉ , अक्षर पटेल आणि नॉर्किजेला ४२. ५ कोटी खर्च झाले. आता त्यांच्याकडे ४७.५ कोटी रुपये आहेत. लखनऊ सुपरजाईंट्सने के एल राहुल, मार्कस स्टोइनीस आणि रवी बिष्णोई या खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ३८ कोटी रुपये खर्च केले. त्यांच्याकडे आता ५२ कोटी रुपये शिल्लक आहेत. गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्या , शुभमान गिल आणि राशिद खान यांच्यासाठी ३८ कोटी खर्च केले. आता त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक आहेत. आयपीएल मेगा ऑक्शन २०२२साठी हे या १० संघाचे बजेट असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!