लखनऊ : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा(Aashish Mishra) याला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा हा गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आहे. आशिष मिश्रा यांच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. परंतु जामीन मिळाल्यानंतरही आशिष मिश्राची तुर्तास सुटका होणार नाही.
आशिष मिश्रा यांना आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 34, 427 आणि 120 बी अंतर्गत आरोपी करण्यात आले आहे. तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25, 5/27 आणि 39 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु हायकोर्टाकडून जारी करण्यात आलेल्या जामीन आदेशात कलम 302 आणि 120 बीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे जामीन मिळूनही आशिष मिश्रा यांना तुरुंगातच राहावे लागेल.
दरम्यान, आशिष मिश्रा यांच्यावर ३ ऑक्टोबर रोजी तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात निषेध मोर्चा दरम्यान चार आंदोलक शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
- एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

