Share

मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.

मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली.

यावेळी आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी बैठकीनंतर दिली. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

‘दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!