Share

मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे

Published On: 

🕒 1 min read

जालना : गायकवाड आयोग अवैध ठरवून मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोण चुकले आणि कोण बरोबर होते यावर बोलण्याची वेळ नाही तर मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यासंदर्भात मार्ग काढण्याची ही वेळ आहे. सध्या मराठा समाजातील राज्यभरातील मान्यवरांशी संवाद साधत असून येत्या २८ तारखेला मुंबईत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला.

खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी जालना येथील मराठा समाजातील समन्वयकांशी संवाद साधला. सध्या आपण राज्यात विविध भागांत फिरतो आहोत. मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे. समाज दु:खी आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे, आता जगायचे कसे? हा प्रश्न समाजासमोर उभा आहे. इतरांच्या सवलती, इतरांना आरक्षण मिळते आहे ते आम्हाला काढून घ्यायचे नाही. तर आमच्याकडे कोण बघणार? ही मराठा समाजाच्या मनातली खंत आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले.

आपण सध्या राज्यभर फिरतो आहोत. यासाठी कोणता राजकीय पक्ष पाठिंबा देतो हे मला महत्त्वाचे नाही आणि कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही. कारण समाज आपल्या पाठीशी आहे, असे खासदार संभाजीराजे म्हणाले. आता नेमके या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे यासंदर्भात राज्यभरातील समन्वयकांशी माझी चर्चा सुरू आहे.

आज गायकवाड आयोग अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. आता ही केंद्राची जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी आहे की १०२ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून काय सिद्ध होणार आहे या सर्वांचा अभ्यास सुरू आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद २८ तारखेला मुंबई येथे घेणार असून त्यात भूमिका मांडणार असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!