मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे. सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैध रित्या फोन टॅपिंग करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तसेच, फडणवीसांनी दिल्ली गाठून पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केला आहे.
याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. ‘रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधी पक्षनेते तोंडावर पडले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांना भेटण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातत ठेवायला हवी होती. त्यांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात.’ अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना खडेबोल सुनावले आहेत.
यासोबतच, ‘देवेंद्र फडणवीस अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळणे फडणवीसांचे भाग्य होते. त्यातून त्यांनी उत्तम प्रकारे कामे केली. विरोधी पक्ष हे शॅडो कॅबिनेट असतं. विरोधी पक्षनेते हे शॅडो मुख्यमंत्री असतात. तुमच्या भाग्यात पुन्हा मुख्यमंत्री होणं असेल. पण असं ओढाताण करून ते मिळवता येत नाही. ते फक्त नागपूरचे नेते नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आम्ही तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो.’ असं भाष्य करत संजय राऊत यांनी फडणवीसांना भविष्यातील राजकीय कामगिरीबाबत सल्ला देखील दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती’
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- पाथरीतील सेलू कॉर्नर परिसरातून पावणे पाच लाखाचा गुटका जप्त, एकास अटक
- पवार साहेब-शाहांची भेट झाली नाही, ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

