परभणी : जिल्ह्यातील पाथरी येथील सेलू कॉर्नर परिसरातील एका गोडाऊनमधून सोमवारी पहाटे चार लाख 80 हज़ार 240 रुपयांचा गुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलाय तसेच एकाला ताब्यात देखील घेतले आहे.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांना पाथरीतील सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटका साठवून ठेवला असल्याची गुप्त मिळाली पोलिसांना मिळाली होती. ही माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली. यावर स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार पवार, फौजदार खोले यांच्यासह पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, विष्णू भिसे, दीपक मुदीराज, अरुण कांबळे, दीपक मुंडे आदींच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सेलू कॉर्नर परिसरात असलेल्या गोदामात छापा मारला.
दरम्यान त्यावेळी तेथे सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याचा साठा पोत्यात भरून ठेवल्याचे आढळले. या पथकाने सर्व साठा जप्त करत गुटक्याची मोजणी केली. या वेळी चार लाख 80 हजार 240 रुपयांचा गोवा गुटक्याचा साठा असल्याचे दिसले. या पथकाने मुद्देमालासह
अवेस खान यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

