Share

‘आज समजले मुंबई महानगरपालिका मिठी नदी साफ का करत नव्हती’

Published On: 

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस सबळ पुरावे समोर येत असल्याने वाझेंच्या अडचणीत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे राबविली जात आहे. बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.

त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक प्रकारचे साहित्य एनआयएच्या हाती लागले आहे. मिठी नदीतून संगणकाचे काही सुटे भाग, डीव्हीआर, सीपीयू, दोन बनावट नंबर प्लेट तसेच इतर साहित्य बाहेर काढण्यात बाहेर आले आहे.

यावर आता भाजपने सरकारवर विशेषतः शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केलेला आहे. मुंबईत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय. त्यावेळी मिठी नदीत एनआयएला लॅपटॉप, डीवीआर सापडल्यानंतर प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

‘मिठी नदी इतक्या दिवस साफ का होत नव्हती हे आता समजलं. मिठी नदीत वाझेंनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर सेनेचं पाप जनतेसमोर उघड करू. शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल म्हणून मिठी नदी साफ केली नाही. आता तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी माफी मागावी,’ अशी टीका सुद्धा प्रसाद लाड यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!