मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळलं असलं तरी ‘ऑपरेशन लोटस’ ची नांदी होत असल्याची कुजबुज आता सुरु झाली आहे.
तर, ही भेट झालीच नाही असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है,’ असं भाष्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत.
चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं.
माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2021
पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच ! – चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सूचक भाष्य केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राष्ट्रवादी-भाजप एकत्र येऊन पुन्हा शपथविधी होऊ शकतो का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत असं सांगताच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘असे अंदाज असतात मात्र आता त्यातील कोणतीही वस्तुस्थिती नाही. जेव्हा ठरेल, तेव्हा नॉर्मली कळेल किंवा त्यावेळच्या शपथविधी सारखं नंतर कळेल.’ त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील उत्सुकता आणखीच वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत नानांच्या मुलाला आमदार करणारच! भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘बांगलादेश लढ्यात मोदींना नेमकी कधी अटक झाली होती? ती माहिती दिल्यास…’
- वारांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

