Share

“किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले हे…”, जितेंद्र आव्हाडांचे ‘मनसे’ला प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यासर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काल (६ एप्रिल) पंतप्रधानांशी चर्चा केली. यावरूनच मनसेने राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीका केली. याला आता राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“कालच्या पवार साहेब आणि पंतप्रधान भेटीवर मनसेनी प्रतिक्रिया दिली आहे. असे म्हणतात विस्मृती हि देवाने दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे. किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले होते हे आमच्या स्मृतीत आहे.”, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेला डिवचले आहे.

दरम्यान शरद पवार आणि मोदींच्या भेटीवर मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep Deshpande) यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधत टोला लगावला. “१७७३ साली ‘काका मला वाचवा’ अश्या आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात ‘माझ्या पुतण्याला वाचवा’ अश्या आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या.”, असे ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

Kisan Credit Card वर व्याज आकारले जाणार नाही? केंद्राने मांडली भूमिका

“राऊत साहेब बलिदान नको, भ्रष्टाचार थांबवा”, सदाभाऊंचा टोला

“मलिकांच्या अटकेनंतर मोदींना भेटण्याची तत्परता का नाही?”, इम्तियाज जलील यांचा शरद पवारांना सवाल

“असल्या वैचारिक लबाडीमुळेच काँग्रेस…”, भातखळकरांचा हल्लाबोल

“अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार…”, महागाईवरून महेश तपासेंचे टीकास्त्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!