Share

राज्य सरकार केंद्राला भाड्याने चालवायला द्या – माजी मंत्री बबनराव लोणीकर

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकार प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवत आहे. प्रत्येक प्रश्न केंद्राने साडवावा असे राज्य सरकारला वाटत आहे. प्रत्येक विकासाच्या कामासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली जात आहे. सर्वच केंद्र सरकारने करावे असे ठाकरे सरकारला वाटत आहे. इतकेच असेल तर राज्य सरकार केंद्रला भाड्याने चालवायला द्या, असा खोचक सल्ला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड संदर्भात आमदार लोणीकर यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणतेही काम करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही, असे म्हणत आहे. अर्थमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीत पैसा जमा करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

राज्याच्या तिजोरीत पैसा जमा करण्याचे कौशल्य अर्थमंत्र्यांचे असते. त्यांना ते काम जमत नसेल तर केंद्रालाच राज्य चालवू द्या, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार एकामागे एक अपराध करत आहेत. शिशुपालाचे १०० अपराध भरल्याशिवाय त्याला शिक्षा करता येत नाही. आता या सरकारचे १०० अपराध झाले असल्याचेही लोणीकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!