औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील नियम अद्याप पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाही. मात्र, दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात लवकरच तसा निर्णय घेण्यात येईल असे वाटत होते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होतांना दिसत आहे.
काही दिवसात औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रातील नव्याने समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या ५० च्या खाली गेली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या १०० च्या खाली आली होती. मात्र, शुक्रवारी औरंगाबाद ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा एकदा किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण मधील शुक्रवारी नव्याने १११ रुग्णांच भर पडलीय. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडलीय.
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी २०३ जणांना (मनपा २५, ग्रामीण १७८) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १४०८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १३० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४५२६४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३३७२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ मृत्यू घाटीमधील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!
- अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
- राज्य सरकार केंद्राला भाड्याने चालवायला द्या – माजी मंत्री बबनराव लोणीकर
- गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल द्या, एमआयएमची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
