Share

आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकाला नमुना टाकण्यासाठी दिलेल्या बाटलीतील द्रवामध्ये डास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारे चाचणी केल्याने वेगळे परिणाम अथवा दोष निघण्याची शक्यता सदर नागरिकाने व्यक्ती केली. मात्र हा प्रकार पहिल्यांदाच झाला असून याआधी अशी घटना घडली नसल्याचा दावा मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केला. तसेच हा नमुना तपासल्याशिवाय पुढे गेलाच नसता म्हणत कर्मचारी वर्गाच्या चुकांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

हा प्रकार महापालिकेच्या एन-२ सिडको कम्युनिटी हॉल येथील चाचणी केंद्रावर गुरुवारी (दि.१७) घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महानगरपालिकेचा हलगर्जीपणा रुग्णांना सहन करावा लागत आहे.

सिडको एन-३ येथील अभ्यासिका चालवणारे अक्षय गोयल हे एन-२ कम्युनिटी हॉल सिडको येथे आरटीपीसीआर चाचणीसाठी गेले होते. त्यामुळे नमुना जतन करण्यासाठी असलेली टेस्ट ट्यूबची प्लास्टिकची बाटली त्यांना दिली. या बाटलीतील पिवळ्या द्रवात त्यांना डास दिसून आला. हा प्रकार पाहून गोयल यांनी आरोग्य सेवकाला सांगितला. सेवकाने हि बाटली चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली.

याविषयी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळकर यांनी सांगितले, या व्यक्तीला दुसरी बाटली देण्यात आली आहे. अशाप्रकारच्या काही किट्स निघतात. ज्यात फॉल्ट असतात. मात्र स्वॅब पूर्ण तपासल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. तसेच सदर केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी अधिक माहिती घेतली असून सर्वकाही ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यामुळे मनपाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!