Share

अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई

Published On: 

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहात आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोर्‍यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली.

लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. दरवर्षी पर्यटक भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची वाट पाहात असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर इथं वर्षाविहार करण्यास पर्यटकांना सक्त मनाई आहे. लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील गुरुवार पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच विविध भागातून धबधबे देखील वाहू लागले आहेत.

परंतु सध्या महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अजूनही संचार व जमावबंदीचे आदेश तसेच पर्यटनस्थळे बंदचे आदेश लोणावळ्यात लागू आहे. पर्यटक लोणावळ्यात येऊ शकतात, हाॅटेल बंगले व फार्महाऊस येथे नियमांचे पालन करून राहू शकतात. मात्र त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही. सर्व पर्यटनस्थळे बंद असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

दरवर्षी लोणावळा शहराच्या अगदी जवळच असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो होण्याची पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटक वाट पहात असतात. परंतु, यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लोणावळा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!